water Health tips : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे, एकदा जरूर वाचा

पिण्याच्या पाण्याचे फायदे

१) पचनसंस्था निरोगी राहते.

उपवासाच्या दिवशी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यापासून आराम मिळतो.

२) वजन कमी होणे.

नियमितपणे पुरेसे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने भूक कमी होते, त्यामुळे आवश्यक तेवढेच अन्न पोटात जाते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवीसोबत बाहेर पडतात. हे पचन सुधारून वजन कमी करण्यास मदत करते.

हेही वाचा: Cooking Oil Rate : आनंदाची बातमी!!! खाद्य तेल स्वस्त,चमचमीत खुशाल खा; पण जपून!

३) थकवा न येणे, अशक्तपणा जाणवणे.

जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तर पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील निर्जलीकरणामुळे थकवा येतो. म्हणूनच दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यावे.याच मुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण साखळी सुरळीत राहते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते.

४) तणाव कमी होतो.

मेंदूतील 70 ते 80 टक्के ऊती हि पाण्यानेच बनलेली असतात. जेव्हा ही पाण्याची पातळी कमी होते आणि शरीरासोबत मेंदूलाही ताण जाणवतो तेव्हा डिहायड्रेशन होते. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी ठराविक अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे.

५) केसांचे सौंदर्य सुधारते.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे केस खूपच नाजूक होतात. केस कोरडे आणि निर्जीव होण्यामागे शरीरातील पाण्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांची वाढ देखील होते .

हेही वाचा: Health tips : द्राक्षे खाण्याचे ४ फायदे, हंगाम संपण्यापूर्वी द्राक्षे खा. हिरव्या-काळ्या द्राक्षांची मजा

दिवसभरात किती आणि केव्हा पाणी प्यावे?


दररोज सकाळी रिकाम्या पोटी किमान 3 ग्लास पाणी प्या.

दुपारच्या जेवणानंतर एक तास पाणी पिणे टाळावे. यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

सकाळी पाणी पिल्यानंतर ४५ मिनिटांनी नाश्ता करा.

रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा तास पाणी प्या आणि झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे टाळा.