School fee free : आर्थिक परिस्थिती बेताची ? तर पाल्याचा प्रवेश मोफत घ्या…
अर्ज कुठे आणि कसा करावा पहा
मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ११० शाळांनी नोंदणी केली आहे साधारणपणे १ हजाराच्या आसपास जागा उपलब्ध आहेत. आता बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीसाठी १ ते १७ मार्च एवढा कालावधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निश्चित करून देण्यात आला आहे.
नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित अर्जांची गटशिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून छाननी केली जाणार आहे. समितीच्या छाननीत पात्र ठरलेल्या अर्जधारकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
