widowed woman government scheme : विधवा महिलांसाठी ‘ह्या’ सरकारी योजना आहे सर्वात बेस्ट ; जाणून घ्या फायदे काय
इंदिरा गांधी पेन्शन योजना
केंद्र सरकारच्या विशेष योजनांपैकी ही एक योजना आहे. ज्याचा लाभ बीपीएल कार्ड असलेल्या महिला घेऊ शकतात. या योजनांचा लाभ फक्त 40 ते 59 वयोगटातील महिलांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे . योजनेअंतर्गत दरमहा 300 रुपये दिले जातात.
विधवा पेन्शन योजना
या सरकारी योजनेंतर्गत विधवा महिलांनाही पेन्शनची सुविधा मिळते. संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये या योजनेची प्रक्रिया वेग वेगळी आहे. महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब कुटुंबातील विधवांना दरमहा 600 रुपये आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यात येणार असून, त्याअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
पंतप्रधान शिलाई मशीन योजना
केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवते. गरीब व गरजू महिला याचा लाभ घेऊ शकतात. विधवा तसेच अविवाहित महिलांना देखील शिलाई मशीन मोफत दिले जाणार आहे . त्याची सुरुवात 2020 मध्ये झाली.
पंतप्रधान शिलाई मशीन योजनाचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा
स्वाधार गृह योजना
ही योजना आपल्या भारत सरकारने 2002 मध्ये सुरू केलेली होती. ज्या अंतर्गत गरजू महिलांना निवारा, अन्न, वस्त्र आणि काळजी सुविधा पुरवल्या जातात. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये तुरुंगातून सुटलेल्या महिला, नैसर्गिक आपत्तीत बाधित महिला आणि विधवा यांचा समावेश आहे.