Nashik city news : नाशिक आता बनणार देशातील पहिली क्वॉलिटी सिटी

नाशिक टॉपर करण्याचे उद्दिष्ट काय

स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत नाशिक प्रथम क्रमांकावर येण्याचा मानस आहे. यासाठी पॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया मदत करण्यास तयार आहे. शहराला लागून असलेल्या पाच गावे आदर्श गावात ज्यात सावरगाव आणि गंगापसहित नवीन तीन गावे जोडली जातील. त्यासाठी हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच गळती थांबविण्यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा: विधवा महिलांसाठी ‘ह्या’ सरकारी योजना आहे सर्वात बेस्ट ; जाणून घ्या फायदे काय

होणार विश्लेषण

घरेलू कामगार, वाहन चालक, शिपाई आणि पर्यवेक्षक स्तरावरील व्हाइट कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्यात हाती घेण्यात येणार आहे. क्वालिटी सिटी नाशिक चळवळीअंतर्गत त्या-त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे परिस्थितीजन्य विश्लेषण केले जाणार आहे . त्यानंतर अडथळे आणि संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणारे प्रारूप आखले जाईल. “कामगार जोडणीपासून घर कामगार, रिक्षा चालक, वाहन चालक, शिपाई आणि डिलिव्हरी बॉयपर्यंत गुणतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नव तर एचआर असोसिएशन आणि नियम मानवी संसाधन प्रशिक्षणावर मध्यम-स्तरीय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊ शकतात.