Skin Care Tips : टोमॅटोचा फेस पॅक पिगमेंटेशन आणि डाग काढून टाकण्यासाठी सर्वोत्तम आहे, अशा प्रकारे तयार करा
टोमॅटो फेस पॅक कसा वापरायचा?
टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त टोमॅटो आणि साखर हवी आहे.
हा फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटो आणि साखर बारीक करून मिक्स करा.
आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि 15 ते 20 मिनिटे चेहरा सुकू द्यावा .
त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
हेही वाचा: Headphone News : तुम्ही सतत हेडफोन वापरत असाल तर सावध राहा, तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे
टोमॅटोचा फेस पॅक लावण्याचे फायदे
पिगमेंटेशनपासून आराम मिळवण्यासाठी टोमॅटोचा फेस पॅक वापरणे खूप प्रभावी ठरू शकते. टोमॅटोमधील लाइकोपीन नावाचा पदार्थ त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतो. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. यासोबतच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. यामुळे टोमॅटोचा रस लावल्याने त्वचेचा रंगही सुधारतो. तसेच, साखरेचा वापर त्वचेची पीएच पातळी राखून त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करते.