H3N2 Influenza 2023 : भारतात आलाय नवीन व्हायरस त्यात आज गेला पहिला बळी, जाणून घ्या या व्हायरसबद्दल

H3N2 ची लक्षणे काय आहेत?


WHO च्या मते, H3N2 संक्रमित रूग्णांच्या लक्षणांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे आणि वाहणारे नाक यांचा समावेश होतो. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की अनेक रुग्णांना सुरुवातीला ताप येतो, त्यानंतर थंडी, खोकला आणि अंगदुखी आणि इतर लक्षणे दिसतात. तसेच अनेक रुग्णांमध्ये पाच ते सात दिवसांत ताप बरा होतो, परंतु सर्दी-खोकला बरा होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात.

इन्फ्लूएन्झाचा धोका कोणाला जास्त आहे?


इन्फ्लूएंझा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला संक्रमित करू शकतो. तथापि, गर्भवती स्त्रिया, पाच वर्षांखालील मुले, वृद्ध आणि सह-विकृती असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला WHO ने दिला आहे.