HSC Exam paper leak : बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी खळबळजनक माहिती; केवळ गणितच नाही तर या दोन विषयांचे पेपर हि फुटले

अहमदनगरमधील मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह पाच जणांना बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये हे सर्व माहिती समोर आलेली आहे. ३ मार्च रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा १२वीचा गणिताचा पेपर तासभर आधी झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर कॉलेजमध्ये 337 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र महाविद्यालयातच आले. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या उद्देशाने शाळा व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपवरून पाठवून प्रत्येकाकडून १० हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. सध्या तपास सुरू आहे.

हेही वाचा: scolarship Mahadbt : विद्यार्थ्यांनो शिष्यवृत्ती हवी आहे ना मग करा हे काम

एसआयटीने बुलढाणा बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लावला आहे
दुसरीकडे, एसआयटीने बुलढाणा येथील बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध घेतला आहे. लोणार येथील एका खासगी शाळेचा शिक्षक अकील मुनाफ हा पेपर फुटीप्रकरणी मुख्य आरोपी असल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे. गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वी अकील मुनाफ याने आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याने पेपरचे फोटो काढून इतरांना पाठवले. दरम्यान, अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.