Onion Subsidy 2023 : सर्वात मोठी खूशखबर! आता या शेतकर्यांसाठी कांदा अनुदान झाले मंजूर, येथे पहा तुम्हाला मिळणार का लगेच?
या कांदा अनुदानासाठी 8 हजार 74 शेतकरी पात्र आहेत. 2018-19 या वर्षात कांद्याच्या भावात लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळेच 2018-19 मध्ये त्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी डावलले गेले. सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी सोपान अॅग्रिकल्चर प्रोड्युस मार्केटिंग कंपनी लिमिटेड बार्शी येथे कांदा विक्री करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान देण्यात येणार असून, ते पात्र शेतकरी या लाभापासून वंचित होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नुकतेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात त्यांना ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे