kanda anudan dada bhuse : कांदा अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; आता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री दादा भुसेंनी थेट तारीखच सांगितली
आता एप्रिल महिन्यात कांदा उत्पादकांना अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले आहे. एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना निश्चितपणे ३५० रुपये प्रति क्विंटल कांद्याचे अनुदान मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना संकटकाळी दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षेइतके अनुदान मिळालेले नाही.
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च पाहता हे अनुदान खूपच कमी आहे. याचमुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या तोंडाला चक्क पाने पुसल्याचा आरोप शेतकरी करतच आहेत.दरम्यान, देवळा येथील वाजगाव येथील कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी भुसे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे मत व्यक्त केले आहे.