New rules from April : १ एप्रिलपासून बदलणार हे मोठे नियम! ताज्या अपडेट्स जाणून घ्या नाहीतर..

पॅन कार्ड संबंधित काम पूर्ण करा


31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार कार्ड लिंक करा, अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय झाल्यामुळे तुम्ही अजिबात आयकर रिटर्न भरू शकणार नाही. यासोबतच आता तुम्हाला बँकेशी संबंधित असलेल्या मोठ्या अडचणींचा देखील सामना करावा लागेल.आधी सरकारने ३१ मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत सांगितली होती परंतु ती आता आपल्यासाठी वाढून देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी लिंक करून घ्या .

HUID शिवाय सोने विकू शकत नाही


1 एप्रिलपासून आता पूर्ण देशात सहा अंकी हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याची विक्री सुद्धा अजिबात करता येणार नाही. गोल्ड हॉलमार्क सोन्याची शुद्धता दर्शवतो. तथापि, ज्यांच्याकडे आता सर्वात आधीच हॉलमार्क नसलेले दागिने आहेत तेसुद्धा आता वैध राहतील.

पुढील महिन्यापासून वाहने आणखी महाग होणार आहेत


जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आता ती ३१ मार्चपूर्वीच खरेदी करून घ्या . Honda, Maruti Suzuki, Tata Motors, Hero MotoCorp 1 एप्रिलपासून वेगवेगळ्या प्रकारातील वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. BS-VI चा दुसरा टप्पा आणि महागाई लक्षात घेऊन कंपन्या ह्या वाहनांच्या किमती जोरदार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिव्यांग व्यक्तींच्या अद्वितीय ओळखपत्र क्रमांकाचा उल्लेख


1 एप्रिलपासून सरकार अपंग व्यक्तींना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक नमूद करणे बंधनकारक करत आहेत. ज्यांच्याकडे आता यूडीआयडी कार्ड नाही अश्या अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडीचा नोंदणी क्रमांक सुद्धा दिला जाणार आहे . हा UDID पोर्टलवरून तयार केला जाईल.

सोन्यावर कर भरावा लागणार नाही


१ एप्रिलपासून सोन्याचे ई-गोल्ड किंवा ई-गोल्डचे सोन्यामध्ये रूपांतर करण्यावर कॅपिटन गेन टॅक्स लागू होणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली. परंतु जर त्याची विक्री केल्यास नियमानुसार कर देखील लागेल.

डीमॅट खाते गोठवले जाईल


सेबीच्या नियमांनुसार ३१ मार्चपर्यंत तुमच्या डिमॅट खात्याचे नॉमिनी अपडेट करा. जे असे करणार नाहीत, त्यांची ट्रेडिंग आणि डिमॅट खाती १ एप्रिलपासून डेबिटसाठी गोठवली जातील.