Gharpoch valu yojna 2023 : घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर..! 1 ब्रास वाळू अवघ्या 600 रुपयांना मिळणार, ‘या’ दिवशी लागू होणार, पाहा अटी व शर्ती..

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या वाळू धोरणामुळे या धोरणातून वाळूमाफियांवर बंदी येणार आहे. यासोबतच गरीब, गरजू घरगुती लाभार्थी, पशु निवारा लाभार्थी व इतर गरीब लोकांना बांधकामासाठी वाळू स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

नवीन धोरणाचा निर्णय चांगला आहे. मात्र, अंमलबजावणीत पारदर्शकता असावी. कोणी कोणाच्या नावाने वाळू उचलली नाही. अन्यथा, गरजूंऐवजी इतरांना फायदा होईल. शासकीय कामासाठी बांधकाम परवानगी किंवा कार्यादेश देताना वाळूचे नेमके प्रमाण स्पष्ट करावे. त्याला तेवढीच वाळू मिळावी, अन्यथा मोबदला न देता वाळूचा काळाबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शासनाच्या या नवीन वाळू धोरणाचा लाभ खऱ्या गरीब गरजू लाभार्थ्यांना मिळावा. त्यामुळे नदीपात्रातून अवैध वाळू उपसा थांबणार आहे. प्रभावी आणि न्याय्य अंमलबजावणी आवश्यक आहे.