SBI Insurance : तुमचे SBI मध्ये खाते असल्यास, 342 रुपये गुंतवा आणि 4 लाखांपर्यंतचे फायदे मिळवा.

4 लाखांपर्यंत बंपर फायदा.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर खालील दोन योजनांची माहिती दिली आहे. बचत बँक खातेधारकांसाठी प्रिमियम ऑटो डेबिट सुविधेद्वारे कापला जातो. एखादी व्यक्ती फक्त बचत बँक खात्याशी लिंक करू शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे PMSBY


मित्रांनो, या योजनेद्वारे, पॉलिसीधारकांचा मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाचे अंशतः कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. या पॉलिसी योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त रु.12 इतकाच आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे PMJJBY


जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक केली तर त्याला अनेक त्याचे फायदे मिळत असतात . विमाधारकाचा जर मृत्यू झाला तर त्या , नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरावा लागेल. वरील दोन्ही अटी विमा पॉलिसी आहेत. हा विमा एका वर्षासाठी असतो, दुसऱ्या वर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते.

हेही वाचा: gautami patil viral : गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तिथल्या महिलांनी हातात काठ्या घेतल्या,अन बघा काय केलं