मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे आणि स्नानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. हिंदू मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी गंगा नदी मध्ये प्रत्येकाने स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे देखील विशेष महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान शंभरपट फळ देते असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, घोंगडी, खिचडी दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते .

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ आणि खिचडी दान केल्याने नशिबात बदल होतो असे मानले जाते. पवित्र काळात या दिवशी दान, स्नान किंवा श्राद्ध करणे शुभ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचा विशेष महिमा शास्त्रात सांगितलेला आहे. या दिवशी शनिदेवाला प्रकाश दान करणे देखील खूप शुभ आहे