Health-TipsHealth-Tips : फळे खाताना या ‘चुका’ कधीही करू नका; आरोग्यावर गंभीर परिणाम होतात
फळे खाताना या गोष्टी टाळा
इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत फळे आपल्या शरीरात लवकर पचतात. फळे इतर कोणत्याही अन्ना मध्ये जर मिसळून खाल्ले तर त्याचे आपल्या शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. दोन पदार्थ मिसळल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे फळांपासून शरीराला मिळणाऱ्या पोषकतत्त्वांचे प्रमाणही खूपच कमी होते. त्यामुळे फळे वेगळे सेवन करणे केव्हाही चांगले.
रात्री फळे खाणे टाळा
झोपण्याच्या २-३ तास आधी काहीही खाणे टाळा, कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. रात्री फळे खाणे आरोग्यासाठी अजिबात सुरक्षित नाही. झोपण्यापूर्वी फळ खाल्ल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो.
कारण या फळामध्ये गोड पदार्थ असतात. जे झोपताना शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवू शकते. रात्री, आपली पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. याशिवाय रात्री फळे खाल्ल्याने अॅसिडिटीची सुद्धा लक्षणे बऱ्याच प्रमाणात दिसू शकतात. संध्याकाळच्या स्नॅकमध्ये तुम्ही फळे खाऊ शकता. मात्र, नंतर फळे खाणे टाळावे.
ताबडतोब पाणी पिणे टाळा
केवळ लहान मुलेच नाही तर आता वडिलधाऱ्यांनाही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी लागत . फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील पीएच पातळी असंतुलित होऊ शकते, विशेषत: टरबूज, काकडी, संत्री किंवा स्ट्रॉबेरी, कलिंगड यासारखी जास्त पाणी असलेली फळे.
याचे कारण असे की भरपूर पाणी असलेली फळे तुमच्या पोटातील आम्लता कमी करून आपल्या शरीरातील पीएच संतुलन देखी बदलू शकतात. असे केल्याने त्या माणसाला डायरिया किंवा कॉलरासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढू शकते, असा इशारा सर्वश्रेष्ठ तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा: Health care : सर्दी, खोकला साधा समजू नका गंभीर इतर आजारापेक्षाही अधिक धोका!!
फळांची साल खाऊ नका
सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे सी आणि ए असतात. एका संशोधनानुसार फळांची साल खाल्ल्याने त्यांचा लठ्ठपणा आणि कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.