हे 5 पदार्थ रक्तातील खराब युरिक ऍसिड लवकर काढून टाकतील; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
ग्रीन टी प्या
ज्या लोकांना युरिक ऍसिडची समस्या आहे. त्यांनी ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टीच्या सेवनाने यूरिक ऍसिडची उच्च पातळी लघवीद्वारे सहजपणे काढून टाकली जाते. ग्रीन टीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्माने भरपूर कॅटेचिन असतात, ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
आहारात फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा
तुमच्या आहारात फायबरयुक्त धान्य आणि भाज्यांचा समावेश करा. फायबर युक्त पदार्थांचे सेवन युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. फायबरयुक्त आहारात ओट्स, संपूर्ण धान्य, भाज्या आणि ब्रोकोली यांचा समावेश करा. हे सर्व फायबरयुक्त पदार्थ युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.
तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा
जर तुम्हाला युरिक अॅसिड नियंत्रित करायचं असेल तर व्हिटॅमिन सी घ्या. आहारात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि युरिक अॅसिडही नियंत्रणात राहते. व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांमध्ये संत्री, लिंबूवर्गीय फळे आणि आवळा यांचा समावेश होतो.
हेही वाचा: Uses of used tea leaves : चहा करा आणि पावडर फेकू नका? त्याचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
चेरी खा
चेरीचे सेवन युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की चेरी यूरिक ऍसिड कमी करतात कारण त्यात अँथोसायनिन्स असतात, जे चेरींना रंग देतात. ज्या लोकांना यूरिक ऍसिड जास्त आहे त्यांनी चेरीचे सेवन करावे.
जास्त पाणी प्या
जर यूरिक अॅसिडची समस्या असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. युरिक ऍसिडचे रुग्ण अधिक पाणी पिऊन युरिक ऍसिड नियंत्रित करू शकतात.