Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.
Accident samrudhi mahamarga: समृद्धी महामार्गावर 29 अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू..
समृद्धी महामार्गाचे(Accident samrudhi mahamarga) उद्घाटन झाल्यापासून शिर्डी-नागपूर यांना जोडणाऱ्या या महामार्गावर अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिर्डी-नागपूर या दरम्यान मागील फक्त 10 दिवसांमध्ये एकूण 29 अपघात होऊन यात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन 33 जण जखमीदेखील झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
समृद्धी महामार्गाचे उद्घाटन(Accident samrudhi mahamarga) झाल्यानंतर त्याच्या अनेक वैशिष्टयांची चर्चा राज्यात झाली, कारण शिर्डी-नागपूर असा 16 तासांचा प्रवास निम्म्या वेळेत होणार म्हटल्यावर वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले. यामुळे अपघातांची संख्या 11 ते 20 डिसेंबर 2022 दरम्यान या महामार्गावर वाढली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची जवळपास 67 प्रकरणे दाखल झाली आहेत.हेही वाचा: आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाहतूक नियमांचे उल्लंघन बऱ्याच वेळा पाहण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग 11 डिसेंबरला सुरू झाल्यापासून महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास 80 किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा आहे. पण बेदरकारपणे वाहन चालविणे, अन्य वाहनांना नियमाचे उल्लंघन करून मागे टाकणे या कारणांमुळे पहिल्या 3 दिवसांत 2 रस्ते अपघात झाले होते.हेही वाच:Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात मायलेक जागीच ठार
बुलढाणा जिल्ह्यात 09 आणि जालना जिल्ह्यात 08 अपघातांची नोंद झाली आहे. वाहतूक नियमन उल्लंघनविरोधात कारवाई करण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर सध्या जबाबदारी सोपवली आहे. समृद्धी महामार्गावर वाहतूक नियम उल्लंघनाची 11 ते 20 डिसेंबरपर्यंत एकूण 125 प्रकरणे झाली. किरकोळ कारवाईमध्ये 1,63,400 रुपये दंड आकारला गेला. एकूण 125 प्रकरणांपैकी 67 प्रकरणे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने दाखल झाली आहेत. यापैकी पुणे परिक्षेत्रातील बाभळेश्वर वाहतूक पोलीस केंद्रांर्तगत सर्वाधिक 27 प्रकरणांची नोंद झाली.