Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Accidental updates:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाचा भीषण अपघात, कुटुंबातील चौघे गंभीर जखमी….
Accidental updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे मोठा अपघात झाला. त्यात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा मुलगा व सूनेसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशी घडली घडना…
प्रल्हाद मोदी हे आपल्या कुटुंबासह बंगळुरूहून बांदीपूरकडे जात होते. म्हैसूर तालुक्यातील कडकोलाजवळ आज (ता. 27) दुपारी अडिच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात कारमधील प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचे सुपुत्र मेहुल मोदी, सूनबाई, नातू मेनाथ मोदी आणि कार चालक सत्यनारायण हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात एवढा भीषण(Accidental updates) होता, की प्रल्हाद मोदी यांच्या कारच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. पुढील चाक नि बोनेटचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या जेएसएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे. सध्याच त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. या घटनेबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही माहिती कळवण्यात आली आहे.हेही वाचा: Breaking news Sikkim : सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली, कशी झाली घटना बघा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रल्हाद मोदी हे धाकटे बंधू असून, ते गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. 2019 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.