Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.
Breaking news Sikkim : 16 जवानांचा मृत्यू
उत्तर सिक्कीममधील(Breaking news Sikkim) झेमा येथे भारतीय लष्कराच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात तब्बल 16 जवानांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
अशी झाली घटना..!!
आज लष्कराच्या(Breaking news Sikkim) तीन गाड्यांमधून सकाळी जवानांचा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने जात होता. गेमा येथे एका वळणावर मोठा उतार असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ते वाहन थेट दरीत कोसळले.
अपघाताबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. या अपघातात तीन कनिष्ठ अधिकारी व 13 सैनिकांसह एकूण 16 जवानांना मृत्यू झाला, तर 4 जवान जखमी झाले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढलं.हेही वाचा:Accident samrudhi mahamarga :समृद्धी महामार्गावर 29 अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू..
आपले केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे . एन. सिक्कीममधील जवानांच्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले असून, त्यांच्या सेवेबद्दल, वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना.. असे त्यांनी म्हटले आहे.