Last Updated on April 26, 2023 by Jyoti S.
Chhattisgarh naxal attack
Chhattisgarh naxal attack – छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात 10 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान जिल्हा राखीव दलाचे (DRG) जवान आहेत. हे जवान आपल्या साथीदारांना आता घेण्यासाठी खासगी वाहनाने अरणपूर इथे जात होते.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही माओवादीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण आता अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच आहे.
या घटनेला आता दुजोरा देत मुख्यमंत्री यांनी भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केलेला आहे. अशी माहिती खेदजनक असल्याचे ते म्हणाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा अंतिम टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू, असे बघेल यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेबाबत ट्विट करून सांगितले की, नक्षलविरोधी(Chhattisgarh naxal attack) कारवाईसाठी आलेल्या डीआरजी दलावर माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये 10 DRG जवान आणि 1 ड्रायव्हर शहीद झाल्याचे वृत्त आहे. ही घटना दंतेवाडातील अरनपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. हे अतिशय दुःखद आहे.
आम्ही सर्व राज्यातील जनता त्यांना नमन करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केली.
ह्या मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा(Chhattisgarh naxal attack) सामना करण्यासाठी आता अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आलेला आहे. सरकारच्या 2021 च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमधील 8 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. त्यात दंतेवाडा, बस्तर, सुकमा, विजापूर, कांकेर, नारायणपूर, राजनांदगाव आणि कोंडागाव यांचा समावेश आहे. एप्रिल 2021 मध्ये, गृह मंत्रालयाने लोकसभेत सांगितले की 2011 ते 2020 या 10 वर्षांत छत्तीसगडमध्ये 3,722 नक्षलवादी हल्ले झाले, ज्यात 489 जवान शहीद झाले.
हेही वाचा: New Sand Policy in Maharashtra : 1 मे पासून हे असतील वाळूचे दर… येथून मिळतील… नवे नियम असे असतील…