fire smoke : शेकोटीच्या धुराने गुदमरून ५ जणांचा मृत्यू

Last Updated on January 10, 2023 by Jyoti S.

fire smoke : शेकोटीच्या धुराने गुदमरून ५ जणांचा मृत्यू

जयपूर (jaypur): राजस्थानात शेकोटीच्या धुरामुळे दोन घटनांमध्ये गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चुरू शाहि जिल्ह्याच्या रतनगडमध्ये सर्दीपासून वाचण्यासाठी घरात शेकोटी पेटवून झोपी गेलेल्या एका कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

३ महिन्यांच्या मुलाची स्थिती अतिशय नाजूक असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर बिकानेरमध्ये(fire smoke) अशाच घटनेत पती आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. सोना देवी (६०), त्यांची सून. गायत्री (३०) आणि गायत्रीची तीन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांचा मुलगा शेकोटी पेटवलेल्या खोलीत झोपले होते.

आजोबामुळे नातू वाचला

कुटुंबीयांनी सांगितले की, आजोबा अमरचंद आणि ६ वर्षांचा नातू कमल स्वतंत्र खोलीत झोपले होते. आजोबांसोबत झोपल्याने कमलचा जीव वाचला. अमरचंद यांचा मुलगा राजकुमार गुजरातमध्ये बांधकाम कंत्राटदार आहे.

हेही वाचा: Trimbakeshwar Accident : त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या बसचा अपघात