Nashik accident Updates : नाशिकमधील भीषण अपघात, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली.

Last Updated on January 13, 2023 by Jyoti S.

Nashik accident Updates: नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सिन्नर(Sinner) तालुक्यातील वावी-पाथरे(Vavi pathare) परिसरातील घटना!!

नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर(Sinner) तालुक्यातील वावी-पाथरे(Vavi pathare) परिसरात ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला.

या अपघातात एकूण 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात दोन पुरुष, सहा महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या अपघातात खासगी बसमध्ये 35 ते 45 प्रवासी होते. यामध्ये पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात व शिर्डी येथील सुपर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताबाबत(Nashik accident Updates) वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

? ???व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.????

या अपघाताचे वृत्त समोर येताच मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत अधिक माहिती घेतली. अपघाताचा भीषण प्रकार पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

यासोबतच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि बचाव पथकाच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यात आली असली तरी.

हेही वाचा: Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती