Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.
Nashik igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण स्फोट.
Nashik Fire News : नाशिकमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण घटना घडली आहे. जिंदाल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. काही कामगार या घटनेत खूपच जखमी झाल्याचं सांगण्यात आले आहे.
आग इतकी मोठी आहे की कित्येक किलोमीटर दूरवरून ती दिसत आहे.नाशिक इगतपुरी(Nashik igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत मोठी आग लागली. जिंदालच्या अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा, आणि तसेच घोटी टोलनाका येथील अग्निशमनच्या बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक महापालिकेचे पूर्ण बंबही आग नियंत्रणात आणण्यासाठी आता मुंढेगावकडे रवाना झाले होते. तसेच नाशिक ग्रामीण चे सगळे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आगीचे लोळ दूरवर दिसत होते. अग्निशामक दलाने आग रोखण्यासाठी खूप प्रयन्त केले .परंतु आग आटोक्यात येत नव्हती तब्बल ३ तास आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते .
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. नाशिकजवळ असलेल्या इगतपुरी मधील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाची एक कंपनी आहे.
जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या ११ वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. जिंदाल समूहाच् पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली .
हेही वाचा: Stunt viral video : भररस्त्यात बाईकवर जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा बघा विडिओ!!
तेथील कर्मचारी सुद्धा त्या कंपनीमध्ये आत अडकल्याच सांगण्यात येत आहे. पोलिसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.