Shimla landslide on shiv temple:श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांवर काळाचा घाला! मंदिरावर दरड कोसळून ५ ठार,तर अनेक..

Last Updated on August 14, 2023 by Jyoti Shinde

Shimla landslide on shiv temple

नाशिक : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे मोठी दुर्घटना घडली. सोमवारी सकाळी सात वाजता मुसळधार पावसामुळे शिव बावडी येथील मंदिर पूर्ण कोसळले आहे. त्यामुळे मंदिरात उपस्थित 25 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. आतापर्यंत 2 मुलांसह 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरितांचाही शोध सुरू आहे.

हे मंदिर शिमलाच्या उपनगरातील बालूगंज भागात समरहिलवर आहे. श्रावण सोमवारमुळे मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती.Shimla landslide on shiv temple

हेही वाचा: Tomato Price update: आनंदाची बातमी! एक किलोचा भाव 300 रुपयांपर्यंत जाणार; जाणून घ्या काय आहे कारण?

पावसामुळे बचाव कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड पडत आहेत. ढिगाऱ्याबरोबरच मंदिराच्या वरती चार ते पाच झाडेही उन्मळून पडली असून, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफची टीम बचावकार्य करत असून मुख्यमंत्री सुखविंदर सिंग घटनास्थळी आहेत

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हि खूप मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सर्वजण दर्शनासाठी आले होते. ढिगाऱ्यात 20 ते 25 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही लष्कर, पोलीस आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.Shimla landslide on shiv temple

हेही वाचा: Crop Loan :अजित पवारांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळणार!