वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात

Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.

मालेगाव- साक्री रोडवरील घटना : दोन ठार; २० वऱ्हाडी जखमी

मुलीकडील वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती साक्री येथे मुलाकडील मंडळीला कळाल्यानंतर विवाहस्थळी शांतता पसरली. मात्र, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत संदीप साळवे यांच्या मुलीचा विवाह साकी येथे पार पडला असल्याचे काही कन्हाडींनी सांगितले.

मालेगाव : तालुक्यातील चिंचवे येथून लग्नसोहळ्यासाठी शुक्रवारी (दि.२) रोजी साक्री येथे जाणाऱ्या वन्हाडाच्या खासगी बसला मालेगाव-साक्री रोडवरील धाकड वारीत भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील दोन वन्हाडीचा जागीच मृत्यू झाला असून, यात एका अकरा वर्षीय मुलीचा सहभाग आहे.

बारीतील अपघाती वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर जखमींना तत्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना नाशिक येथे, तर काहींना मालेगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चिंचवे येथील रहिवासी संदीप बाळू साळवे यांच्या मुलीचा शुक्रवारी (दि.२) साक्री येथे विवाह होता. या विवाहनिमित्त ते वऱ्हाडींना घेऊन मालेगाव येथील खासगी स्कूल बस (क्र. एमएच ४१ एव्ही.९८०५) ने साक्री येथे निघाले होते. दरम्यान, डनावरील नियंत्रण सुटल्याने हा साडे अकरा वाजेच्या सुमारास मालेगाव ते साक्री रोडवरील (म्हसदी मार्गे) धाकड बारीतील अपघाती वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बारीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, बसने बारीत कोसळत असताना चार ते पाच पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. चिंचवे येथील काही वऱ्हाड़ी खासगी वाहनाने, दुचाकीने बसमागून येत असल्यामुळे अपघाताची तत्काळ माहिती मिळाली. स्थानिकांच्या मदतीने वऱ्हाडींना बसमधून बाहेर काढत तत्काळ रुग्णवाहिका किंवा मिळेल त्या वाहनाने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मखमलाबाई बारकू ह्याळीज (वय ६०, रा. करंजगव्हाण), मयुरी विकास बोरसे (वय ११, रा. कोपरगाव) या दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य २० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. बसच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने चालक दीपक आहिरे (मालेगाव) याने धावत्या बसमधून बाहेर उडी घेत बस सोडून दिल्याचे जखमींनी सांगितले.

जखमींची नावे: पूनम पाटील (वय १०, रा. सुरत), श्रद्धा पाटील (वय १३, रा. सुरत), मीराबाई बोरसे (वय ३६, रा. शिर्डी), निकीता साळवे (वय २५, रा. चिंचवे), चित्राबाई साळवे (वय ५५, रा. चिंचवे), मंगलबाई देवरे (वय ५० रा. चिंचवे), शंकर पवार (वय ५९, रा. चिंचवे ), जे. पाटील (वय ४०, रा. सुरत), लावण्या चव्हाण (वय ९, रा. जळगाव), रविना साळवे (वय २०, रा. चिंचवे), गायत्री साळवे (वय १४, रा. चिंचवे), बापू साळवे (वय ६०, रा. चिंचवे ), सुमनबाई खैरनार (वय ६८, रा. चिंचवे), सुवर्णा साळवे (वय ४०, रा. चिंचवे ), मंगलबाई. साळवे (वय ४८, रा. चिंचवे ) याशिवाय अन्य जखमींवर मालेगावातील खासगी रुग्णालयात. उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले असून, यापैकी मयत मयुरी बोरसेची आई मीराबाई बोरसे यांची प्रकृतीदेखील गंभीर असल्याने त्यांना तत्काळ नाशिक येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले. अन्य काही जखमींवर मालेगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री वर्तवलसे यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. हा अपघात मालेगाव तालुक्याच्या सीमेबाहेर आणि तालुक्याच्या हद्दीत झाल्यामुळे या अपघाताची साक्री पोलीस ठाण्यात नोंद झाली.आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा