Last Updated on January 10, 2023 by Jyoti S.
Trimbakeshwar Accident: झाडामुळे भाविकांना जीवदान
Table of Contents
बुलढाणा जिल्ह्यातील बस : १४ प्रवासी झाले जखमी
त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar Accident) : संत निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या खासगी सोमवारी (दि. ९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अपघात झाला.
आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रह्मगिरी(Bramhagiri) परिसरातील हॉलिडे रिसॉर्ट परिसरात बस चालकाचे उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दोन झाडांवर आदळून उलटली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, चार गंभीर जखमींना जिल्हा शासकीय सोमवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्र्यंबक येथे येत्या १८ रोजी संत निवृत्तीनाथांची यात्रा आहे.
त्र्यंबकेश्वर संत निवृतीनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या खासगी बसला सोमवारी (दि. २) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अपघात झाला.
ब्रह्मगिरी परिसरातील हॉलिडे रिसॉर्ट परिसरात बस चालकाचे उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दोन झाडांवर आदळून उलटली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, चार गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वरला(Trimbakeshwar Accident) १८ जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथांची यात्रा भरत असून, त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारच्या भागात सुमारास संत निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी २९ प्रवासी घेऊन खासगी बस (क्र. एमएच २८ एबी ७५०५) ही त्र्यंबकेश्वरला आली होती. संत गजानन महाराज मठात ते मुक्कामी होती.

निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन ते परत बुलढाण्याला निघाले. रिंगरोडने एमटीडीसीच्या शेजारील उताराने बस खाली येत असताना उतारावर बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट मार्गात आलेल्या दोन झाडांना पाडून उलटली.
तेथील नागरिकांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले आणि खासगी वाहनातून त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे(Dr.mandakini barve) डॉ. भागवत लोंढे(Dr.bhagvat londhe) यांनी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली तर ४ गंभीर जखमीमा नाशिकच्या जिल्हा
गंभीर जखमीमध्ये अर्जुन जयपाल पाकड (वय ११), तापाबाई प्रल्हादसिंग राजपूत (४४), प्रेमसिंग मोतीसिंग पाकड़ (१०) व काशीबाई फुलसिंग उसारे (६०) यांचा समावेश आहे. अन्य जखमींमध्ये बसचालक गौतम विठ्ठल वाघुळे (२३. सु. जाफराबाद, जि. जालना), शांताबाई प्रकाशसिंग मुराडे (६०), मंगलसिंग मरखडसिंग भखड (५५), लक्ष्मीबाई फुलसिंग उसारे (७०). मेनका रामकिसन उसारे (३८). शांताबाई प्रेमसिंग मुराडे (६०), भिकाबाई मंगलसिंग मुरार्डे (५०), प्रेमसिंग काळुसिंग पाकड (५५), रतनसिंग शिवालाल धनावट (६५), वत्सलाबाई प्रभाकर तिठे (७०, सर्व रा. सांडोलगाव, ता. जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे.
चालक म्हणतो, ब्रेक फेल झाले !
• दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाच्या म्हणण्या- नुसार, ब्रह्मगिरी परिसरात हॉलिडे रिसॉर्ट परिसरात म्हणण्यानुसार बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बस उलटली. बसमध्ये २९ प्रवासी होते. सदर बस ही चांडोळ येथील सरस्वती विद्यामंदिरची असल्याचे सांगण्यात आले. ही बस संस्थाचालकाने मोफत उपलब्ध करून दिली होती.
हेही वाचा: Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !
अपघाताच्या घटनेनंतर त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे, सेवाभावी कार्यकर्ते कैलास पाळेकर, सागर उजे, उमेश जोशी, लाला लड्डा, नितीन शिंदे, भीमा गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केल्याने जखमींना वेळीच वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले.
दरम्यान घटनास्थळी पोलिस नाईक सचिन गवळी, कॉन्स्टेबल श्रावण साळवे, नितीन गांगुर्डे, पी. सी. मोरे यांनी धाव घेत पंचनामा केला.