
Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.
एकाचा मृत्यू, 21 जण जखमी
जेरुसलेम : इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास दोन बॉम्बस्फोट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक प्रकारचा समन्वयित दहशतवादी हल्ला असल्याचा दावा इस्रायल पोलीस आणि बचाव कर्मचाऱ्यांनी केला आहे. या स्फोटानंतर या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, तपास यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आले आहे.
पहिला स्फोट सकाळी सात वाजता जेरुसलेमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील भागात झाला असून दुसरा स्फोट जवळपास साडेसात वाजता प्रवेशाच्या आणखी एका प्रवेशद्वाराजवळच झाला आहे . त्यांनी असा विचार केला होता कि जास्तीत जास्त लोकांचा जीव घेऊन स्फोटकांसोबत मोठ्या प्रमाणात खिळेसुद्धा ठेवण्यात आले होते, तसेच त्यांनी दोन्ही स्फोटकांना सारख्याच रिमोट उपकरणाद्वारे नियंत्रित सुद्धा करण्यात आलेले होते.
अजूनसुद्धा कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाहीय ; परंतु दहशतवादी संघटना हल्ल्यांचे कौतुक केल्याने यापाठीमागे त्यांचाच हात असण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. जेरुसलेमकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात आलेला आहे तसेच व्यापक तपास अभियान सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान याइर लापिद, संरक्षणमंत्री बेनी गँट्ज आणि लोक संरक्षणमंत्री उमर बारलेव यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि तपस सुरु झाला आहे. हेही वाचा :जानोरीत बायोडिझेल निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त