
Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.
सिन्नर परिसरात झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी
सिन्नर : शिर्डीवरून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबईच्या साईभक्तांची तवेरा कार सिन्नर-शिर्डी महामार्गावर पलटी झाल्याने दोन साईभक्त ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचे पूर्ण नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील काही साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला आले होते. दर्शन घेऊन ते परतीच्या मार्गावर असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या तवेरा (क्र. एमएच 04 क्यूझेड 9228) कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी महामार्गावरून दीडशे फूट लांब पलटी झाली. यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात मीरा-भाईंदर इंद्रदेव मोरया (वय 28) आणि सत्येंद्र यादव (वय 27) यांना गंभीर मार लागल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर या वाहनातील आणखी सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि काही स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना नाशिकच्या एका रुग्णालयात हलविण्यात कार पलटी झाल्याने मुंबईचे दोन साईभक्त ठार आले होते. सिन्नर-शिर्डी महामार्ग साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या ‘भाविकांमुळे कायमच गजबजलेला असतो. साइदर्शनास आतुर असलेले हे मुंबईचे भक्त शिर्डीवरून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेले होते. या आधीही या महामार्गावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. मात्र, सकाळी झालेल्या या अपघाताने प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवला आहे.
Comments are closed.