चांदवडला लाल कांद्यास 5100 उच्चांकी दर

Last Updated on November 25, 2022 by Jyoti S.

उन्हाळ कांद्याला सरासरी1170 रुपये भाव

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि. 24) चांदवड बाजार समितीत आसरखेडे येथील शेतकरी पवन पवार यांच्या नविन लाल कांद्यास 5100 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला. तर उन्हाळ सरासरी 1170 रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी 1170 रुपये बाजारभाव मिळाला.कहीयेनविन लाल कांद्याच्या आवकेत वाढ होणार होणार आहे. त्यामुळे आवक वाढून बाजारभाव कमी होणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने काढणीनंतर तो लगेच विक्री करावा लागतो. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षेने कांदा साठवून देखील ठेवता येणार नसल्याचे शेतकरी चिंतेत आहे.सध्याचा स्थितीत उन्हाळ कांद्याची नियमितपने आवक सुरू असून, बाजारभावात सुधारणा झालेली आहे.गुरुवारी उन्हाळ कांद्यास कमीत कमी 400 व जास्तीत जास्त 2100 आणि सरासरी 1170 रुपये दर मिळाला. त्याचप्रमाणे भुसार शेतीमालाची देखील अंदाजे तीन हजार क्विंटलची आवक झाली असून, मका शेतीमालास कमीत कमी 1765 जास्तीत जास्त 2111 तर सरासरी1970, सोयाबिनला कमीत कमी 3000 जास्तीत जास्त 5500 तर सरासरी 5300 पर्यंत बाजारभाव मिळाले.मका आणि सोयाबिन तसेच मूग व हरभरा इ. शेतीमालाची सुद्धा बाजार समितीत आवक होत चाललेली आहे.

चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्री केल्यानंतर तत्काळ रोख स्वरुपात पेमेंट अदा केले जाते. त्यामुळे तालुक्यातील तालुक्याबाहेरील व अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधव चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्री करण्यासाठी येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल प्रतवारी करुनच चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा. तसेच माल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात घेण्यात यावी. माल विक्री, वजनमाप अथवा पेमेंट संबंधी कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक अनिल पाटील व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे.