Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.
Agricultural Innovations: प्रयोग, दशपर्णी प्रयोगापुढील पाऊल
वाशिम पिकावरील कीटकनाशकाचा नायनाट करण्यासाठी कृषी(Agricultural Innovations) विभागासह शेतकरी दशपर्णी वापरण्याचा सल्ला देतात. अनेक शेतकरी स्वतःच दशपर्णी बनवून पिकांवर फवारणी करतात. आता आपल्या वाशिम तालुक्यातील एका शेतकऱ्याने पुढे जाऊन सेंद्रिय कीटकनाशक तयार केले आहे.
यामध्ये दशपर्णीत वापरल्या जाणाऱ्या पानांव्यतिरिक्त अद्रक, लसूण व मिरचीचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. यामुळे आता त्या पिकांवरील अळ्यांच्या शरीराची आग होत असल्याने किडींचा नायनाट होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.
तिथल्या वाशिम तालुक्यातील बिटोडा तेली येथील देवीदास राऊत व त्यांचे दोन भाऊ आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोगासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या अगोदर पीकवाढीसाठी टॉनिक तयार केले. आता एक सेंद्रिय कीटकनाशक तयार केले आहे.
यामध्ये लसूण, अद्रक, मिरचीचा वापर केला जात आहे. यामुळे आता तेथील अळींच्या शरीराची आग होऊन अळीचा नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सेंद्रिय कीटकनाशकामुळे पिकांवरील अळ्यांची अंडी पूर्णपणे नष्ट करणे, धुईवर परिणामकारक असे हे बुरशीनाशक तसेच कीटकनाशक आहे.
हेही वाचा: Letter scheme : मोफत पत्र्याचा स्टॉल घ्या अन् व्यवसाय करा!
सेंद्रिय कीटकनाशकात आहे समावेश
दशपर्णीसाठी लागणाऱ्या पानांसह विविध पर्णाचा समावेश या कीटकनाशकात(Agricultural Innovations) करण्यात आला आहे. यामध्ये करंजा, निंब, सीताफळ, रुई, बेशरम, गोचिडी, आघाडा, चंद्रज्योती, निरगुडी, गुळवेलची पाने, मिरचीचा समावेश आहे. निंबोळी अर्क यासह अद्रक, लसूण, मिरचीचा समावेश आहे.
तसेच या कीटकनाशकाचा उग्र वास येत असल्याने धुईवर देखील याचा परिणाम होतो. यात अद्रक, लसूण व मिरची असल्याने अळींच्या शरीराची आग होते, तसेच याचा पिकांना फायदा पिकांवर करण्यात येत असून याचा होतो. हा प्रयोग आमच्या शेतातील चांगला फायदा होत आहे.
- देवा राऊत.
प्रयोगशील शेतकरी, बिटोडा तेली