
Last Updated on December 8, 2022 by Jyoti S.
agricultural: शेती उत्पादन विक्रीला ‘कॉर्पोरेट टच’; मांड्यापासून चिकन बिर्याणीचा ‘मेन्यू’
नाशिक, ता. ७ : डोंगरे वसतिगृह मैदानावरील जिल्हा कृषी (agricultural) महोत्सवात दीड दिवसांमध्ये सव्वा कोटीची उलाढाल झाली 35 हजारांहून अधिक शेतकरी, नाशिककरांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. शेती आणि संलग्न उत्पादनांच्या विक्रीसाठी कृषी विभागाने उभारलेल्या १३५ स्टॉलला ‘कॉर्पोरेट टच’ दिला आहे. खवय्यांसाठी मांडापासून ते चिकन बिर्याणी कुळाची जिलेबी, नागलीची भाकर, कुळीद पिठले, थालीपीठ असा जिभेला पाणी सोडणारा ‘मेन्यू’ विक्रीसाठी उपलब्ध आहे.अश्याच नवनवीन बातम्या बघण्यासाठी लगेच आमचा मराठी बातम्या ग्रुप जॉईन करा.
महोत्सवात तांदूळ, नागली, गव्हाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मशरूम सूप, रोल उत्पादनाचा ‘लाइव्ह डेमो’ ची व्यवस्था केली आहे. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर पॅकेजिंग, मशिनरी, कृषी (agricultural)निविष्ठा, सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्टॉल आहेत.

जांभूळ, स्ट्रॉबेरी, आंब्यापासून उत्पादित केलेली चॉकलेट, जेली, ज्यूस, रोपे, कृषी (agricultural) निविष्ठा उपलब्ध आहेत. मालेगावमध्ये शेती महामंडळाची ३० एकर शेती घेतलेल्या निवृत्त सैनिकांच्या प्रोड्युसर कंपनीतर्फे जीवामृत, कृषीनिविष्ठा, पापड बनवणे, कांडप यंत्र, शॉर्टिंग मशिन ठेवल्या आहेत. या शिवाय सोलापूरच्या मालू ब्रँडचा ज्वारीपासून तयार केलेली बिस्किटे, चिवडा नाशिककरांसाठी दाखल झालेला आहे. सेन्सरद्वारे कांद्यातील आर्द्रता शोधणारे यंत्र महोत्सवात आकर्षित करत आहे.
तेराशे ग्रॅमचे सीताफळ, अन अर्धा किलोचे डाळिंब महोत्सवात तेराशे ग्रॅमचे सीताफळ, अर्धा किलोचे डाळिंबाचा समावेश आहे. खपली गव्हाची बिस्किटे, जळगावच्या भरताची वांगी, येवल्याची मोरावळा कॅण्डी, नंदुरबारची मिरची, पेठचा निळा- काळा-लाल रंगाचा तांदूळ, पिंपळगावची हळद, मिरची पावडरसह मसाले, रायगडच्या महिला गटाचा कोकणी मेवा, अशी विविध उत्पादने महोत्सवात ठेवली आहेत. एवढेच नव्हे, तर यंत्रसामुग्रीचे ११ स्टॉल्स आहेत.Solar Rooftop:फ्री मधे घरावर बसवा सोलार,आणि राहा 23 वर्ष बिलापासून मुक्त
दोन रोपवाटिका, ७० शेतकरी आणि महिला गट, वैयक्तिक १०० शेतकरी, खासगी कंपन्या १०० महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यातील दररोज पाचशे शेतकऱ्यांना महोत्सवात आणले जात आहे. दुसऱ्या दिवशी पौष्टिक तृणधान्यासंबंधी चर्चासत्र झाले. नाचणी पैदासकार योगेश बण यांनी तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व भविष्यातील संधी याविषयावर, तर महेश लोंढे यांनी लघू उद्योजकांसाठी भरडधान्य व्यवसायातील संधी, आहार तज्ज्ञ हिमाणी पुरी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व, नीलिमा जोरवर यांनी तृणधान्यातील शेतकरी गट तथा कंपनीसाठी संधी याविषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
Comments are closed.