Tuesday, February 27

Ajit Pawar breaking news: पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत मिळणार,अजित पवार

Last Updated on December 12, 2023 by Jyoti Shinde

Ajit Pawar breaking news: सध्या मंत्रिमंडळ विस्तार नाही

नाशिक : नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये कापूस, धान, तूर यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केल्याशिवाय ते अजिबात कळणार नाही. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, कांदाप्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल(Piyush goyal) यांची भेट घेतली आहे तर इथेनॉल(Ethanol) संदर्भात मी स्वतः काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो आहे. आता हा प्रश्न दिल्लीस्तरावर असल्याने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांशी भेट घ्यावी लागणार आहे. सभागृह सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय घालून दिल्लीला जाण्याचे नियोजन करावे लागले.Ajit Pawar breaking news

हेही वाचा: Post Office Scheme For Women: महिलानों या दोन पोस्ट ऑफिस योजनांमध्ये लाखोंच्या परताव्यासाठी पैसे गुंतवा!

मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांना सावर

■ पुरवणी मागण्यांमध्ये ४० हजार कोटींचा निधी सत्ताधारी आमदारांना दिल्याचा टीका तथ्यहीन असल्याचेही पवार म्हणाले. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न नाही. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना मदत करणे, कांदाप्रश्न आणि इथेनॉलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना सरकारचे प्राधान्य राहणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे पवार म्हणाले.Ajit Pawar breaking news

टिकणारे आरक्षण देणार

मराठा आरक्षण हे कायद्याच्या,नियमाच्या चौकटीत असलेले आणि टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आणि टिकणारे आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.Ajit Pawar breaking news

हेही वाचा: Changes From 1st December: १ डिसेंबरपासून हे नवीन नियम; त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार.