
Last Updated on July 13, 2023 by Jyoti Shinde
Nashik apple news
नाशिक : आरोग्यासाठी पोषक समजल्या जाणाऱ्या सफरचंदांची प्रामुख्याने जम्मू-काश्मीर भागातून आयात केली जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चाचरगाव (ता. दिंडोरी) येथील जमिनीत सफरचंदाची यशस्वी लागवड झाली आहे.
मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातर्फे हरमन ९९ या काश्मिरी सफरचंद जातीची लागवड करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. (Apple on the tree in the premises of MVIPR Agriculture College Nashik News)Nashik apple news
चाचरगाव परिसरात महाविद्यालयाच्या वतीने सफरचंदाची लागवड करण्यात आली. सफरचंद प्रथमच झाडावर.
संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण म्हणाले,सफरचंद व्यतिरिक्त महाविद्यालयाने कोकणगावच्या मैदानात अननस, आंबा, जायफळ, कोकम, दालचिनी, विविध प्रकारचे नारळ, लेमन ग्रास, फणस, पेरू, लिंबू आदी सात प्रकारची प्रायोगिकपणे लागवड केली आहे. हे प्रयोगही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.Nashik apple news
त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये आंतरपिकेही घेतली जातात. तसेच या ठिकाणी रोपवाटिकाही स्थापन करण्यात आली असून तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने नवनवीन तंत्राचा वापर करून शेती विकसित करण्याचे प्रयोग सुरू आहेत.
हेही वाचा: Pune Tourism News सावधान! पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी जातायं,ही बातमी वाचा आणि मग ठरवा!