Tuesday, February 27

Baramati agriculture exhibition: टोमॅटोच्या रोपांवर लावले चक्क बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्र

Last Updated on January 23, 2024 by Jyoti Shinde

Baramati agriculture exhibition

नाशिक : बारामती कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या रोपाबरोबरच बटाट्याचे रोपही आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राने आधुनिक टोमॅटो विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.

कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञानांद्वारे शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण संशोधन केले जाते. नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा करून देणे आणि देशातील अन्नधान्य उत्पादन वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी बारामतीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात राज्यभरातून शेतकरी जमले आहेत. कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या रोपाबरोबरच बटाट्याचे रोपही आहे. याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बटाटे आणि टोमॅटो एकाच वेळी एकाच रोपावर वाढू शकतात.Baramati agriculture exhibition

हेही वाचा: Onion Price Will Increase: शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव वाढणार का?पहा.

‘पोमॅटो’ पाहण्यासाठी गर्दी

शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी एक महत्वपूर्ण संकल्पना राबवली आहे. देशात प्रथमच नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्रात “पोमॅटो” या नवीन संकल्पनेची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. “पोमॅटो” हे बटाटे आणि टोमॅटोचे मिश्रण आहे. ह्या टोमॅटोच्या रोपाचे कलम करून हे बटाट्याचे पीक घेतले आहे. याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना व्यवस्तीत रित्या या पिकाची कामगिरी पाहता येणार आहे.

टोमॅटोच्या वर टोमॅटो आणि खाली बटाटे असा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी दोन पिकांचे उत्पन्न मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. बारामती येथील कृषी प्रदर्शनात हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.Baramati agriculture exhibition

कर्ली पार्सली कोथिंबीर

कृषी विकास ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे कृषी प्रात्यक्षिक सुरू आहे. या प्रदर्शनात विदेशी कोथिंबिरीचे यशस्वी पीक घेण्यात आले आहे. ही विदेशी कोथिंबीर पाहण्यासाठी आता शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. या कोथिंबिरीचे नाव कर्ली पार्स्ले आहे.

हेही वाचा: Ram Mandir Latest Photos: राम मंदिराची आजची नवीन छायाचित्रे…सौंदर्य आणि भव्यता पहा; भक्तीच्या सागरात रामनगरी