Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा

Last Updated on January 8, 2023 by Taluka Post

Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा

बीड(Beed Farmer) जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी रुपये चुकून जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाल्याने त्यांना आनंद झाला असेल; मात्र तो औटघटकेचा ठरणार आहे.सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

कसे वसूल करणार?

ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाले असतील, त्या खात्याला १० हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकन्यास ती रक्कम काढता येत नाही.

कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १२ कोटी रुपये चुकून जमा झाले आहेत. आता ही रक्कम(amount) परत घेण्यासाठी विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. बजाज अलायन्झ कंपनीने ११ बँकांना पत्र लिहून त्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेलाही दिली आहे.

हेही वाचा:Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान