
Last Updated on August 24, 2023 by Jyoti Shinde
Big increase in onion price
आगामी काळात कांद्याच्या दरात मोठी वाढ होणार अशी माहिती देण्यात आलेली आहे .अशा स्थितीत आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणखी फटका बसण्याची भीती आहे.
गेल्या काही काळात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना झाला आहे. आता टोमॅटोचे भाव स्थिर होऊ लागले आहेत.अशा स्थितीत आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणखी फटका बसण्याची भीती आहे.Big increase in onion price
परिणामी जनमतही विरोधात जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊनच आता केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र, सरकारच्या या धोरणांचा कांदा उत्पादकांवर परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी इतर पिकांसह कांद्याचा ‘बफर स्टॉक’ ठेवते. कधी-कधी जास्त भाव किंवा उत्पादनात घट किंवा इतर कारणांमुळे या बफर स्टॉकमधून विविध एजन्सीमार्फत राज्य सरकारला अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.
त्यामुळे आवक वाढते आणि भाव नियंत्रणात राहतात त्याचा परिणाम बाजारात आवक झाल्याने भाव वाढणार असल्याचे बोलले जात आहे. कांदा रोजच्या स्वयंपाकात वापरला जात असल्याने त्याची रोज गरज असते. मात्र, उत्पन्न कमी झाल्यास किंमत वाढते. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतो. हे सर्व टाळण्यासाठी केंद्र सरकार बफर स्टॉकमधून तीन लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात सोडणार आहे. ज्या राज्यांमध्ये कांदा खराब झाला आहे किंवा उत्पादनासह आवक कमी झाली आहे, तेथे केंद्रामार्फत स्वस्त दरात कांद्याचा पुरवठा केला जाईल. या उपायामुळे कांद्याचे भाव नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत, असा विश्वास केंद्र सरकारला आहे.Big increase in onion price
ई-ऑक्शन’, ‘ई-कॉमर्स’द्वारे विक्री
कांद्याच्या किमतीबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण सचिवांनी नुकतीच नाफेड आणि एमसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली. बैठकीत कांद्याची दरवाढ, दर नियंत्रण, कांद्याचा साठा आणि मर्यादा यावर चर्चा करण्यात आली. केंद्राच्या बफर स्टॉकमधून या संस्थांमार्फत कांद्याची विक्री आणि ‘ई-ऑक्शन’ आणि ‘ई-कॉमर्स’द्वारे कांद्याची स्वस्तात विक्री या पर्यायांचाही विचार करण्यात आला आहे.Big increase in onion price
मुळात कांदा हा महत्त्वाचा पदार्थ नाही. अनेक वेळा कांद्याचे भाव इतके घसरतात की उत्पादकांचे भांडवलही निघत नाही. कधी-कधी भाव वाढतात पण त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी किंवा मध्यस्थांना होतो. त्यामुळे ‘बफर स्टॉक’मधून कांदा बाजारात आणणे शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर नाही. नागरिकांना तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देणारे धोरण सरकारने राबवावे.
कांदा साठवणूक माहीती
वर्ष — ‘बफर स्टाॅक’
२०२१-२२ — १
२०२२-२३ — ३ (लाख मेट्रिक टनांमध्ये)