Last Updated on December 22, 2022 by Taluka Post
BioGas: घरगुती बायोगॅस उभारा; २७ हजार रुपये मिळवा ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नाशिक(BioGas) : राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्याला १३० बायोगॅसचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बायोगॅस उभारणीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदानही देण्यात येते. अनुसूचित जमातींसाठी २८ अनुसूचित जातीसाठी १२ आणि ९८ सर्वसाधारण गटासाठी देण्यात आले आहे. गटनिहाय अनुदानाची रक्कम वेगवेगळी देण्यात येते.
काय आहे योजना ?
ज्या शेतकन्यांकडे पशुधन आहे, त्यांनी बायोगॅस संयंत्र उभारून बायोगॅस निर्मिती करण्याबरोबरच त्यापासून निर्माण होणाऱ्या इतर प्रोडक्टचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचबरोबर इंधनावर होणारा खर्च वाचावा या निमित्ताने परिसरातील स्वच्छता व्हावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस योजना राबविण्यात येत आहे.
१३० घरगुती बायोगॅसचे उद्दिष्ट
वर्षानुवर्षे राबविण्यात येणाऱ्या या योजनेत मागील वर्षी खंड पडला होता. या वर्षापासून पुन्हा ती राबविण्यात येत असून, यावर्षी जिल्ह्यासाठी १३० बायोगॅस उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण गटातील शेतकयांसाठीचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे.
१७ हजारांपासून २७ हजारांपर्यंत अनुदान
अनुदान घरगुती स्वरूपात बायोगॅस संयंत्रणा उभारणीसाठी केंद्र शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या वतीने २ मेट्रिक टनांपर्यंतचा प्रकल्प उभारणीसाठी केंद्राच्या वतीने २२ हजार रुपये अनुदान देण्यात येते. यात काम पूर्ण होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५००० अनुदान देण्यात येत असते.
अर्ज कसा करणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावर योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाते.
कागदपत्रे काय लागणार?
राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी असणे गरजेचे असून, त्याच्याकडे किमान पाचपेक्षा अधिक पशुधन असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाचा सातबारा उतारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
केंद्र पुरस्कृत या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सेंद्रिय शेतीचाही पुरस्कार करावा. बायोगॅसच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या इतर प्रॉडक्टचा शेतीला खत म्हणून वापर करता येतो. -अभिजित जमधडे, मोहीम अधकारी, जिल्हा परिषद, नाशिक
हेही वाचा: Zero tillage: जीरो टिलेज मशागत यंत्रावर 80% पर्यंत अनुदान मिळेल, असा लाभ घ्या.