Last Updated on January 27, 2023 by Jyoti S.
Cars on dung : शेणावर गाड्या धावतील!
थोडं पण महत्वाचं
बायोगॅसमुळे भारताच्या आर्थिक विकासाला मदत होईल. यामध्ये ग्रामीण भाग मोठा हातभार लावणार आहे. यासाठी कंपनीने भारत सरकार आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
नवी दिल्ली(New Delhi): ऑटोमोबाईल उद्योगातील प्रमुख मारुती सुझुकी आता नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. भविष्यात गाड्या पेट्रोल, डिझेल, बॅटरी किंवा सीएनजीवर चालणार नाहीत, तर शेणावर चालतील. 2030 पर्यंत 6 नवीन इलेक्ट्रिक कार(Cars on dung) लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. याशिवाय कंपनी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या प्रकल्पानुसार गायीच्या शेणामुळे गाड्या चालवण्यास मदत होणार आहे.
कुठल्या गाड्या आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वाढत्या प्रदूषण आणि किमतींशी लढण्यासाठी कंपनी या योजनेवर काम करत आहे. कंपनी बायोगॅस वापरत आहे. हा बायोगॅस शेणापासून बनवला जाणार आहे. ग्रामीण भागात गायींची संख्या अधिक आहे. याच्या मदतीने बायोगॅसची(Cars on dung) निर्मिती सहज होऊ शकते.
सीएनजीचा 70 टक्के हिस्सा
एका अहवालानुसार, भारतीय कार बाजारात सीएनजीचा वाटा 70 टक्के आहे. अशा परिस्थितीत सीएनजीला पर्याय म्हणून बायोगॅस आणल्यास त्याचा मोठा फायदा होईल. त्यासाठी शेणापासून बायोगॅस बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.