Last Updated on December 12, 2022 by Taluka Post
Chakan: चाकणमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
चाकण(Chakan): खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक झाली. हिरवी मिरची व कांद्याचे भाव कोसळले आहेत फळभाज्यांची व पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होऊनही भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल २ कोटी ४० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,२५० क्विटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात ३०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १ हजार ८०० रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,७५० क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६५० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये. क्विंटलने वाढल्याने भावात ३०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून २,३०० रुपयांवर स्थिरावला.
बंदूक व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढल्याने कमाल भाव ५ हजार रुपयांवरच स्थिरावला.हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भावात घट झाली. हिरव्या मिरचीला २000 ते ३000 रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
पालेभाज्यांची आवक जुड्यांमध्ये व मिळालेला दर: मेथी एकूण ५२ हजार ५०० जुड्या (४०० ते ६०० रुपये), कोथिबीर एकूण ४० हजार २५० जुड्या (४०० ते ७०० रुपये.), शेपू एकूण ३ हजार ६५० जुड्या (४०० ते ८०० रुपये), पालक एकूण ५ हजार ४५० जुड्या (३०० ते ६०० रुपये). जनावरे : चाकणला शेळ्या-मेंढ्यांची आवक कमी झाली असून, विक्रीसाठी आलेल्या ६,२२५ शेळयापैकी ६,१०० शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना २000 रुपयांपासून १५000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
हेही वाचा: Coriander Bajar Bhav: कोथिंबीर, शेपू, पुदिनाच्या भावात घसरण