Monday, February 26

Chief Minister Kisan Yojana : ‘मोठी बातमी! पीएम किसानप्रमाणेच राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार आहे.

Last Updated on February 20, 2023 by Jyoti S.

Chief Minister Kisan Yojana

Chief Minister Kisan Yojana: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून योजना सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राबविण्यात येणार आहे. या नव्या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Water Detector App : शेतात बोअर करायचा असेल तर अशा प्रकारे पाणी तपासा,100% पाणी बाहेर येईल..!

अर्थसंकल्पात तरतूद

तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यासाठी येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.

योजनांबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा

दरम्यान, अजून या योजनेचे नियम आणि पात्रता अद्यापहि स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: crop list 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार नुकसान भरपाई

Comments are closed.