Last Updated on December 12, 2022 by Taluka Post
Coriander Bajar Bhav : कोथिंबीर, शेपू, पुदिनाच्या भावात घसरण
पुणे : पुणे मार्केटयार्डात रविवारी (दि. ११) कोथिंबीर, शेपू, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा आणि चुका यांच्या भावात घसरण झाली असून मेथी आणि करडईच्या भावात वाढ झाली आहे.तर कांदापात, चाकवत, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची १ लाख ५० हजार गड्डी व मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

झाली. रविवारी घाऊक बाजारात मुळ्याच्या भावात गड्डीमागे तीन रुपये, कोथिंबीर, शेपू, पुदिना आणि चुक्याच्या भावात गड्डीमागे दोन रुपयांनी आणि राजगिऱ्याच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे. तर, मेथीच्या भावात दोन रुपये आणि करडईच्या भावात एक रुपयाने वाढ झाली असून इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
हेही वाचा: Rooftop Solar Scheme : रूफटॉप सौर योजनेला 2026 सालापर्यंत मुदतवाढ