Last Updated on January 7, 2023 by Taluka Post
Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान
Corn planting
मका पिकाचे खत नियोजन व व्यवस्थापन कसे करावे मका लागवड माहिती sweet corn farming in india पेरणी नियोजन व बियाण्याची निवड कोणती करावी उत्पादन वाढ कशी करावी व होनारा बिनकामी खर्च कसा कमी करावा
जमीन व पेरणीची पद्धत
खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
रबी हंगाम १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
• जमीन – मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.
• पूर्व मशागत – जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. त्या वेळी २५ गाड्या
• शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
• पेरणीची पद्धत – उन्हाळ्यात उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी ओळीतील अंतर ६० ते ७५ सें.मी. व दोन रोपात २० ते २५ सें. मी. लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी – दोन ओळीस ६० सें. मी. व दोन रोपात २० सें. मी. सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी. रबी हंगामातील पेरणी सरी वरंबा पद्धतीने करावी.sweet corn farming in india
• बियाण्याचे प्रमाण – हेक्टरी १५-२० किलोग्रॅम बियाणे पुरेसे.
• बीजप्रक्रिया – २ ते २.५ ग्रॅम थायरम प्रति किलोग्रॅम बियाणे. त्यानंतर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक १५ ग्रॅम प्रति किलो बियाणे चोळावे.
मका सुधारित जाती

रासायनिक खत
उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठी
नत्र, स्फुरद व पालाश १२०-६०-६० किलो प्रति हेक्टर खतमात्रा द्यावी. त्यातील नत्र ४० किलो पेरतेवेळी, २० दिवसांनी पुन्हा ४० किलो, ४० ते ४५ दिवसांनी ४० किलो या प्रमाणे नत्र विभागून द्यावे.sweet corn farming in india
आंतरमशागत –
पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंत एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्याद्वारे तणांचा बंदोबस्त करावा.
तणनाशक वापर-
पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अट्रॉझीन (५० टक्के) हे तणनाशक १ किलो किंवा पेंडिमिथॅलीन १ ली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनींवर फवारावे.sweet corn farming in india