फळ बाजारात सफरचंदाचे वर्चस्व!

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

इराणी सफरचंदाची आवक वाढली | सीताफळाला पसंती

नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारावर सफरचंदाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. प्रतिदिन ७०० ते १ हजार टनची आवक होत आहे. संत्री व मोसंबीची आवकही वाढली असून, ग्राहकांकडून सीताफळालाही पसंती मिळू लागली आहे.

बाजार समितीमध्ये फळांची आवक व फळ मार्केटमध्ये प्रतिदिन १५०० ते १८०० टन फळांची आवक होऊ लागली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, पपई, कलिंगड यांची नियमित १०० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. हिमाचलच्या सफरचंदाचा हंगाम सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये सफरचंदाला ६० ते ९० रुपये दर मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये १०० ते २०० रुपये किलोदराने सफरचंद विकले जात आहे

घाऊक बाजारात इराणी सफरचंदामुळे काश्मीर आणि किन्नर सफरचंदाची दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. इराणी टर्की, आणि न्यूझीलंडमधून सफरचंदाची आवक होत आहे. इराणी सफरचंद ८० ते १०० रुपये तर काश्मीर सफरचंद ६० ते ९० रुपये किलो घाऊक बाजारात विक्री होत आहे.एपीएमसीमध्ये सीताफळ ४० ते ८० रुपयांना विकले जात असून, किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.नागपूरच्या संत्र्यांनाही ग्राहकांची स मोठी पसंती मिळत आहे.

स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ

महाबळेश्वर व नाशिक येथून तालुक्यातून स्ट्रॉबेरीची आवक वाढू लागली आहे. प्रतिदिन जवळपास ६ टन आवक होत असून, होलसेल मार्केटमध्ये १२० ते २०० रुपये किलो असा दर मिळत आहे. होलसेल मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळत आहे.

डाळिंबाचा भावही वधारला

एपीएमसीत मार्केटमध्ये डाळिंबही भाव खात आहेत. होलसेल मार्केटमध्ये जवळपास १२० ते १८० द रुपये दराने विकले जात आहेत..

द्राक्षची आवक सुरू

एपीएमसी मार्केटमध्ये नाशिकमधून द्राक्षाची आवक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिकमधील काळी द्राक्षदेखील बाजारात उपलब्ध होत आहेत. काळी द्राक्ष १५० ते १८० रुपये तर पिवळी द्राक्ष ६० ते ७० रुपये किलो आहे.

असेच प्रत्येक मालाचे भाव बघण्यासाठी खाली क्लिक करा

news on whatsapp 1 Taluka Post | Marathi News

Comments are closed.