Last Updated on January 4, 2023 by Taluka Post
Farmer Gold: आपल्या शेतात काय पेरले तर सोने उगवेल?
नाशिक(Farmer Gold) : वारेमाप रासायनिक खतांचा(chemical fertilizers) वापर केल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढले; मात्र जमिनीचा पोत बिघडला. यामुळे जमिनीची उगवण क्षमता कमी झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्या पिकाला किती खत टाकावे, कोणते खत टाकावे त्यातून आपला आर्थिक फायदा कसा होईल याची शेतकऱ्यांना माहिती असतेच असे नाही.यासाठी शासनाने माती परीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून माती परीक्षण केल्यानंतर येणाऱ्या अहवालावर तुमच्या शेतातील माती कशी आहे, त्यात काय पेरले म्हणजे काय उगवेल याचा अंदाज बांधणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
यामुळे आपल्या शेतातील माती परीक्षण करुन त्यानुसारच शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ८३२० पैकी ७३२० शेतकऱ्यांना अहवाल देण्यात आला आहे. यासाठी जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या मृद संधारण विभागाच्या वतीने माती परीक्षण करुन शेतकऱ्यांना दाखल्यांचे करण्यात येते. वेगवेगळ्या योजनांतर्गत वेगवेगळे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे.
मातीची आरोग्यपत्रिका म्हणजे काय?
■ आपल्या जमिनीत किती पोषक घटक आहेत. मूलद्रव्यांची स्थिती काय आहे याची माहिती मातीच्या आरोग्य पत्रिकेतून मिळत असते.
■ वर्षातून किमान दोनदा माती परीक्षण केल्यास आपल्याला वेळोवेळी जमिनीचे आरोग्य कळते. त्यानुसार नियोजन करणे शक्य होते.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे
सतत उत्पादन घेत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडतो. जमिनीचा पीएच कसा आहे हे समजून घेण्यासाठी मातीची तपासणी करणे महत्त्वाचे असते, यामुळे शेतकऱ्यांना काय पेरायचे कोणते खत वापरायचे याची माहिती मिळते.
साडेपाच हजार शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिका वितरित
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ८१०० शेतकऱ्यांच्या माती परीक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ५७६० शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे…
खताचा अतिमारा धोकादायक
(वारेमाप रासायनिक खताचा वापर जमिनीसाठी धोकादायक ठरतो.यामुळे जमीन निर्जीव होण्याचा धोका असतो. याशिवाय रासायनिक खताचे दुष्परिणाम मानवी शरीरावरही होतात.
मातीची काळजी कशी घ्याल?
वर्षातून किमान दोनवेळा मातीचे नमुने मृद संधारण विभागाच्या प्रयोगशाळेत देऊन त्याची तपासणी करावी. त्यानी दिलेल्या अहवालानुसार तपासणी करुन घ्यावी.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी माती परीक्षण करुन घेतल्यास आपल्या शेतात रासायनिक खत टाकण्याची गरज आहे किंवा नाही याची माहिती करुन घ्यावी. वेळीच ही प्रक्रिया न केल्यास जमिनी निर्जीव होऊन पिकांची उत्पादकता कमी होण्याचा धोका निर्माण होळ शकतो. -अनिल गावित, जिल्हा मृदसंधारण अधिकारी, नाशिक
हेही वाचा: Grant Drip yojna: 80 टक्के अनुदानावर ठिबक घ्या अन कमी पाण्यात मालामाल व्हा !