Monday, February 26

Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..

Last Updated on December 18, 2022 by Taluka Post

Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

Farmer Schema: सुगीच्या दिवसांत बरेचदा शेतमालाचे भाव कोसळलेले असतात.. मात्र, शेतकऱ्यांकडे आपला माल साठवणुकीची कोणतीही सुविधा नसल्याने कमी दरात त्याची विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात घामाचे योग्य दाम पडत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने शेतकऱ्यांसाठी धान्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी योजना आणली आहे. शेतकऱ्यांना सरकारी गोदामात आपला धान्यसाठा अगदी सुरक्षितरित्या ठेवता येतो. या शेतमालाला 100 टक्के विमा संरक्षण मिळते. शिवाय धान्यसाठ्याची वखार पावती बँकेत तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्जही मिळते.

नुकसान झाल्यास भरपाई

शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवण दराच्या 50 टक्के सवलतीत 25 टक्के जागा आरक्षित करण्यात येते. शिवाय प्रत्येक पंधरवड्याला कीड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी कीटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवता येतो. सर्व मालाला विमा संरक्षण असल्याने नुकसान झाल्यास भरपाईही मिळते.

वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार बँकेतर्फे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनव ऑनलाइन तारण कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत वखार पावतीवर शेतमाल किमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून दिले जाते.

इतर बँकेच्या तुलनेत तारण कर्जाचा व्याजदर सर्वात कमी म्हणजेच 9 टक्के आहे. शेतकऱ्याला तारण कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये, तर 75 लाख रुपयांचे कर्ज शेतकरी उत्पादक कंपनीला मिळू शकते. शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाइन कर्ज तात्काळ उपलब्ध होते. तसेच शेतमालाला चांगले भाव आल्यावर ते विकता येते..

हेही वाचा: Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!

Comments are closed.