Farmers loan : मुदतीत कर्जफेड करणाऱ्यांना आठवडाभरात ५० हजार

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

Farmers loan: मुदतीत कर्जफेड करणाऱ्यांना आठवडाभरात ५० हजार

जिल्हा बँकेचे तांत्रिक दोष दूर : बारा हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक : जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची(Farmers loan) मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या शासनाच्या योजनेतील तांत्रिक अडथळा दूर झाला असून, सुमारे साडेबारा हजार शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सहकार विभागाच्या डीबीटी सॉफ्टवेअरमधील दुरुस्ती करण्यात आल्याने, येत्या आठवडाभरात या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१६ पासून शेतकरी स्वाभिमान योजना जाहीर केली , त्यात पीककर्जात आणि दीड लाखापर्यंत सवलत, एकरकमी कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे असे सांगितले .

शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाच्या या आर्थिक(Farmers loan) मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केली जाते. शासनाने या योजनांना मुदतवाढ दिली असून, आतापर्यंत या संदर्भातील कार्यवाही सुरुच आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेबारा हजार शेतकयांनी एकरकमी पीककर्जाची मुदतीत परतफेड आता केली आहे. त्यांना शासनाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणे आवश्यक असताना, त्यासाठी सहकार विभागाच्या डीआयएफडी या सॉफ्टवेअरमध्ये सध्या तांत्रिक बिघाड झाला आहे . परिणामी, जिल्हा बँकेने अनुष्नासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत ग्राह्य होऊ शकली नव्हती.हेही वाचा: Goat rearing : शेळीपालन व्यवसायातून कमाईची संधी, राज्य सरकारच्या योजनेबाबत जाणून घ्या..

या संदर्भात अहमदनगर येथे सहकार विभागाने घेतलेल्या कार्यशाळेतही नाशिक जिल्ह्याच्या वतीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता . नाशिक प्रमाणेच नागपूर जिल्हा बँकेच्या पात्र शेतकऱ्यांनाही या तांत्रिक दोषाचा फटका बसलेला आहे. जिल्हा बँकेकडे सहकार विभागाने लावलेल्या तगाद्यानुसार, तसेच सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोष दूर झाल्याने आता नव्याने पात्र शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आली असून, ती ग्राह्य धरण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात जिल्हा बँकेकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येऊन शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुदानाची रक्कम हातात मिळावी

■ एकरकमी कर्जाची(Farmers loan) परतफेड केल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असले, तरी जिल्हा बँकेनेसदरची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरच ठेवावी.

■ बहुतांशी वेळेस बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम परस्पर वळती करून घेतली जाते. त्यामुळे जिल्हा बँकेने अनुदानाची रक्कम खातेदाराच्या खात्यावरच ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.

Comments are closed.