शेतकऱ्यांना दुधाने दिले, मात्र पशुखाद्याने पळविले

Last Updated on December 2, 2022 by Taluka Post

श्रीरामपूर : राज्यात सर्वाधिक ३० लाख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथमच ३५ रुपये लिटर दर मिळत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये हा उच्चांकी दर मानला जात आहे. देशांतील नामांकित कंपन्यांनी जिल्ह्यात दूध संकलनामध्ये बस्तान बसविल्याने स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. मात्र, – पशुखाद्याच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांना या दराचा लाभ होताना दिसत नाही.

गायीच्या दुधाला सध्या लिटरमागे ३५ रुपये दर मिळतो आहे. म्हशीच्या दुधाचे दर ५२ रुपयांवर पोहोचले आहेत. ग्राहकांनाही दूध पिशवी तब्बल ५० रुपये लिटरने खरेदी करावी लागत आहे. वर्षभरापूर्वी गायीच्या दुधाचे दर २८ ते ३० रुपये लिटर (स्निग्धांश ४.०) होते. मात्र, तीन महिन्यांपासून दुधाचे वाढलेले दर टिकून आहेत. त्यामुळे • शेतकऱ्यांना मोठा लाभ होतो आहे.दरम्यान, नगर जिल्ह्यात प्रतिदिन दुधाचे संकलन ३० लाख लिटरवर गेले आहे. गेली अनेक वर्षे दूध संकलनामध्ये राज्यात नगर जिल्हा अव्वल राहिला आहे. पूर्वी ठराविक कंपन्यांची व्यवसायामध्ये मक्तेदारी होती..

आता मात्र अनेक नामांकित कंपन्यांनी जिल्ह्यात बस्तान बसविले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमूल, प्रभात, राजहंस, सोनाई, गोवर्धन, पतंजली, कुठे या दुग्ध उद्योगांचा समावेश आहे. गुजरात येथील अनेक डेअरी उद्योगयेथून दूध संकलन करीत आहेत. या कंपन्या आघाडीवर यामध्ये अमूलसह गोध्रा, बनासकांठा आहेत.

दररोज १० कोटींची उलाढाल

■ ग्रामीण भागामध्ये दैनंदिन खर्चाकरिता शेतकऱ्यांना एकमेव दुधाच्या व्यवसायाचा आधार आहे.

■ गेल्या काही वर्षामध्ये नगर जिल्ह्याने या व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यात दररोज १० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे.

  • त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे.