नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Last Updated on June 16, 2023 by Jyoti Shinde

खतांवर अनुदान देण्याचा सरकारचा प्रस्ताव

नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असून आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खतांवर अनुदान देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस करण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी’ ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये दिले जात आहेत. लवकरच आता नव्या अर्थसंकल्पात खतांच्या अनुदानाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्याच वर्षभरात युरियाच्या आयात किमतीत 135 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तसेच डीएपीच्याहि किमतीत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे .

या पार्श्वभूमीवर खत मंत्रालयाने अनुदानाची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. अर्थसंकल्पात खतावर अनुदान जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय गॅसच्या दरवाढीमुळे खत कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकार अनुदान जाहीर करण्याचा विचार करत आहे. अनुदान वाढवण्यासाठी खत मंत्रालयाने सल्लामसलत केली आहे.

पुढील व्यावसायिक वर्षासाठी आम्हाला अनुदानाचे पैसे अधिक लागतील, अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालय केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित भागधारकांशी संवाद साधत आहे. अर्थसंकल्प तयार करण्याआधी सल्लामसलत करणे, हा त्याचा हेतू आहे. याअंतर्गत खत मंत्रालयाने 2.25 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना खतांवर मोठे अनुदान मिळाले तर त्याचा पिकांसाठी मोठा फायदा होऊ शकणार आहे.

हेही वाचा: PM किसान योजना नवीन हेल्पलाइन क्रमांक: 13वा हप्ता मिळेल की नाही, माहीत आहे का?

Comments are closed.