ग्राहकांची मानसिकता बदलली तर शेतकरी समृद्ध होईल

Last Updated on November 25, 2022 by Jyoti S.

पालकमंत्री दादा भुसे : कृषीथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक: कांदा, टोमॅटोच्या पडलेल्या दारामुळे आज शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याचे काम सरकारकडून होतेच आहे. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये कांदा भजीसाठी सहजपणे 500 हजार रुपये मोजणाऱ्या ग्राहकानेही आपली मानसिकता बदलायला हवी. महागड्या मोटारीमधून उतरत भाजीपाला दर कमी करून विकत घेणे किंवा दर जास्त असल्याचे सांगत पुढे जाणे, ग्राहकाची ही मानसिकता बदलली तरच शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.

त्र्यंबक रस्त्यालगतच्या ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन 2022 या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि.24 ) पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खा. हेमंत गोडसे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, देविदास पिंगळे, विजय पाटील, अश्विनी न्याहारकर, रश्मी हिरे आदी उपस्थित होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती देताना भुसे यांनी ग्राहकांच्या मानसिकतेकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना सढळ हाताने सहकार्याची गरज आहे. ही भावना जोपर्यंत समाजाच्या मनात येणार नाही, तोवर शेती क्षेत्राचा न्याय निवाडा होऊ शकणार नाही. शेतकऱ्याच्या कष्टाला माणूस म्हणून न्याय द्यायला हवा. ग्रामीण भागात अगदी पहाटेपासून नुसता शेतकरी नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब अगदी शाळेत जाणारे लहान मूल सुद्धा शेतावर राबते. निसर्गाच्या अडचणी, रोगराई अशा वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पीक वाचलेच तर दर मिळत नाही, असे त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनातील ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, हवामानाचा अंदाज देणारे अॅप आदी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून ते आपल्या शेतापर्यंत कसे नेता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जिल्ह्यात टोमॅटोचा प्रश्न भेडसावत असून, त्यावर प्रक्रिया करता येईल का यादृष्टीने लहान प्रकल्प देता येतील. शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकरी गटांना सहाय करता येईल. या पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा क्रांतिकारी निर्णय इतिहासामध्ये प्रथमच घेतला गेला. राज्यात दोन, अडीच हजार कोटीहून अधिकची मदत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा झाली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजाराचे अनुदान प्रदर्शनातील ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, हवामानाचा अंदाज देणारे अॅप आदी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून ते आपल्या शेतापर्यंत कसे नेता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जिल्ह्यात टोमॅटोचा प्रश्न भेडसावत असून, त्यावर प्रक्रिया करता येईल का यादृष्टीने लहान प्रकल्प देता येतील. शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकरी गटांना सहाय करता येईल. राज्यात दोन, अडीच हजार कोटीहून अधिकची मदत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा झाली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजाराचे अनुदान दिले जाईल .