Last Updated on May 23, 2023 by Jyoti S.
Fertilizers News : P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) अश्या खतांसाठी अनुदान जाहीर केलेले आहे.
हे अनुदान 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच लागू करण्यात येणार आहे
एनबीएस (न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी) योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान खतातील पोषक तत्वांच्या आधारे दिले जाते, म्हणजे त्या खतामध्ये किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील खतांवरील अनुदानाबाबत आता केंद्रीय मंत्रिमंडळाची १७ मे ला बैठक पार पडली.
या बैठकीनंतर केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी जाहीर केले की, “भारत सरकार खरीप हंगामात खतांच्या किमतीत वाढ करणार नाही. युरियासाठी 70 हजार कोटी रुपये आणि डीएपीसाठी 38 हजार कोटी रुपये खतांवर अनुदान म्हणून दिले जातील. दिले
म्हणजेच आपले सरकार खतांसाठी आता १ लाख ८ हजार कोटी रुपयांची सबसिडी सुद्धा देणार आहे.यंदा खतांच्या दरात वाढ होणार नाही. मांडविया यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, “शेतकऱ्यांना युरिया, डीएपी आणि एनपीके खते आजही मिळतात त्याच किमतीत मिळत राहतील.”
सध्या खतांचे दर काय आहेत?
खतांच्या किमती वाढवल्या जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सध्या ज्या किमतीत खते मिळत आहेत त्याच किमतीत खते उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे खतांचे सध्याचे दर जाणून घेणे गरजेचे आहे.
युरिया हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे. सर्व खत उत्पादक कंपन्यांकडून(Fertilizers News) शेतकऱ्यांना 45 किलोच्या युरियाच्या पिशव्या 266 रुपयांना मिळत आहेत. 50 किलोची पिशवी 295 रुपयांना उपलब्ध आहे.डीएपी खताची ५० किलोची पिशवी साधारणपणे १३५० रुपयांना मिळते.
मोप खताची किंमत –
कोरोमंडल – रु. 1700
इंडियन पोटॅश लिमिटेड – रु. 1700
महाधन – रु. 1780
कृभको – रु 875
जुगारी – रु 875
खताचा दर्जा आणि कंपनीनुसार, 50 किलोच्या पिशवीची किंमत खालीलप्रमाणे आहे-
खत ग्रेड -NPK -10:26:26
इफको – 1470 रु
महाधन – 1470 रु
कोरोमंडल – 1470 रु
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या खताची किंमत – रु. 1470
खत ग्रेड -NPS – 20-20-0-13
कोरोमंडल – रु. 1200
इफको – रु 1200
महाधन – 1300 रु
ग्रीनस्टार – रु. 1275
खत ग्रेड -NPK – 12-32-16
कोरोमंडल – 1470 रु
इफको – 1470 रु
महाधन – रु. 1800
प्रदीप फॉस्फेट लिमिटेड – 1470 रु
खतांच्या किमती स्थिर राहतील की कमी होतील?
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सध्याच्या दरानुसार खत उपलब्ध होईल. परंतु, सामान्यत: सरकारने अनुदान जाहीर केल्यानंतर खत उत्पादक कंपन्या खतांच्या किमती जाहीर करतात.
खतांच्या किमतीबद्दल(Fertilizers News) बोलताना बुलढाणा जिल्ह्यातील खत पुरवठादार सोहन सावजी सांगतात, “खत कंपन्यांनी अद्याप दर अपडेट केलेले नाहीत.खत विक्रेते भाऊसाहेब नरवडे सांगतात, ‘खते विक्रीचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. मात्र मागील वर्षी जे खतांचे दर होते तेच यंदाही कायम राहणार आहेत. सरकारने हे स्पष्ट केले आहे.”
ऑनलाईन पद्धतीने खतांच्या किमती बघा
कोणत्याही कंपनीच्या खताची किंमत जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम किसान सुविधाच्या वेबसाइटला भेट द्या.
येथे Fertilizers या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर Fertilizer Price या पर्यायावर क्लिक करा.
तेथे खताची अवस्था आणि प्रकार निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.आता लगेच पुढे तुम्ही निवडलेल्या खताच्या प्रकारासाठी कंपनीने दिलेली मूळ किंमत तुम्हाला दिसेल.तुम्ही तुमच्या जवळच्या खत विक्रेत्याकडे खत साठ्याची उपलब्धता देखील तपासू शकता.
त्यासाठी या वेबसाइटवर जा आणि फर्टिलायझर्स या पर्यायावर क्लिक करा आणि ‘फर्टिलायझर स्टॉक स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आता राज्य, जिल्हा आणि विक्रेत्याचे नाव निवडा आणि सबमिट या बटणावर लगेच क्लिक करा. तेथे तुम्हाला त्या विक्रेत्याकडे मेट्रिक टनात कोणते खत उपलब्ध आहे ते दिसेल(Fertilizers News)