Last Updated on December 19, 2022 by Jyoti S.
Goat rearing: शेळीपालन व्यवसायातून कमाईची संधी, राज्य सरकारच्या योजनेबाबत जाणून घ्या..
पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु केली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
शेळीपालन योजनेसाठी अटी
शेळी पालन(Goat rearing) सुरु करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 9000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक, ज्यात 100 शेळ्या व 5 बोकड ठेवता येतील. तसेच चारा पिकवता येईल.योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती / एलपीसी / भाडेपट्टा करार / 9,000 चौरस मीटर जागेचा दृश्य नकाशा सादर करावा लागेल.स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. एक लाखाचे कर्ज घेतल्यास, एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणताही दस्ताऐवज द्यावा लागेल.हेही वाचा: Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!

अर्जदारासाठी पात्रता
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
शेळीपालनाचा(Goat rearing) अनुभव असावा.
स्वतःची जमीन असणे आवश्यक
अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक आहे.
इथे करा ऑनलाईन अर्ज – http://mahamesh.co.in/